Posts

वर्ग: 12 वा. विषय मराठी

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃 *सह्याद्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ब्राह्मणवाडा.* 🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃 वर्ग:१२वा.         विषय: मराठी.                 📖गद्यपाठ 8 वा.📖            *रेशीमबंध*        डॉ. यु. म. पठाण (1930)        *लेखक परिचय* 👉सुप्रसिद्ध साहित्यिक, संतसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक, कथालेखक, संशोधक संपादक व नामवंत वक्ते. 👉'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित; 'ज्ञानोबा-तुकाराम ' या पुरस्कारानेही महाराष्ट्र शासनाकडून सन्मान. 👉 'मराठी बखरीतील फारसीचे स्वरूप' या विषयावर संशोधन. 👉👉 मराठी व हिंदी साहित्याचे संशोधन-आवडीचा प्रांत. 👉 मराठवाड्यातील विखुरलेल्या शिलालेखांचा, ताम्रपटांचा शोध 👉 1990 साली पुणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. 👉 *संपादित ग्रंथ* 1. भाऊसाहेबांची बखर 2.मराठवाड्यातील लोककथा 3.महानुभाव साहित्य संशोधन:खंड 1. 👉 *लेखसंग्रह* 1.संतसाहित्य चिंतन 2.शोधणी 3. आठव ज्ञानदेवाचा...ज्ञानदेवीचा     *पाठपरिचय* पाठाचे ...

*शालेय जीवनातील आठवणी*

🌾 शाळेतील आठवणी🌾       1. ...आणि दप्तर मिळाले!        _____________________          तसा शाळेत असताना मी कमालीचा विसराळू. मला ओळखणारे, माझे जवळचे मित्र, अरुण जाधव, शांताराम मधे, अशोक संगारे, मच्छिंद्र घोडके, पोपट देशमुख, अरुण देशमुख, ज्योत्स्ना, इंदिरा, (माझ्या भाऊबंद.😃) , संदीप मालुंजकर या सर्वांना माझ्यातील या न्यूनत्त्वाचा चांगलाच परिचय होता. पाचवी, सहावी आणि सातवीपर्यंत मी रुंभोडीला (दत्तवाडीला) मामांकडे राहायचो. शेतातली सगळी 'मज्जा' उपभोगत मी शाळेत यायचो. मामी मला रोज जेवणाचा डबा द्यायची. वर्गातील सगळे ग्रुपने जेवण करायचे; कधी वर्गातच, तर कधी नदीच्या काठावरील बागेत. जेवण झाल्यावर डबा कसाबसा बेंचपर्यत जायचा, पण घरी तो क्वचितच जायचा. बहुतेक तो नेहमीच वर्गात विसरायचा. त्यामुळे दररोज जेवण कशात द्यायचे असा रास्त प्रश्न मामीला पडायचा. मामा आणि आजी खूप बोलायचे. अनेक वेळा मार देखील..... अर्थात ते तरी काय करणार? नंतर मला फडक्यात जेवण द्यायला लागले, तर फडक्याचीही तीच तऱ्हा! कधीच फडके घरी जाईना. घरचे माझ्या या विसराळू पणाला अक्षरश...